दिक्षी : सोमनाथ चौधरी
तरुणांनी ठरवले तर कुठलेही काम अश्यक्य नाही याचाच प्रत्यय निफाड तालुक्यातील दिक्षी गावात आला ,दिक्षी गावात मंगळवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास एक अंत्यविधी झाला ,अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत घेले असता स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अंधार होता पण पर्याय नसल्याने उपस्थित नागरिकांच्या मोबाईल टॉर्चच्या आधाराने अंत्यसंस्कार करण्यात आले,त्यानंतर अंधारात अंत्यसंस्कार करावे लागणे हे चुकीचे आहे तर स्मशानभूमीत व नदीकाठावर असलेल्या शिव मंदिरात लाईटची सोय करावी अश्या प्रकारची मागणी गावातील एका महत्वाच्या व्हाट्सएप ग्रुपवर करण्यात आली .ग्रुपवर बरीच चर्चा झाली पण त्यांनतर पाच दिवस झाले तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची लाईटची सोय करण्याची हालचाल केली नाही हे लक्षात आले असता तरुणांना एकत्र येत स्व खर्चाने लाईट आणले ,तसचे छोटी मोठी दुरुस्ती करत संपूर्ण स्मशानभूमी परिसर उजेडात आणला तसचे शिव मंदिरात लाईटची सोय करण्यात आली तरुणांच्या ह्या सामाजिक कार्याचे गावभरात कौतुक होत आहे
आम्ही तरुणांनी स्मशानभूमीत व शिव मंदिरात वीज पुरवठा सुरळीत करून कुठल्याही प्रकारचे राजकारण केले नाही हा केवळ एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविण्यात आला उपक्रम आहे
अक्षय चौधरी
अध्यक्ष छत्रपती प्रतिष्ठान दिक्षीग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या पथदीप कायम दुरुस्ती करण्यात येत असतात पण सध्या सुरू असलेल्या पावसाने स्मशानभूमीतील पथदीप बंद होता यापुढे अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येणार नाही
भारत परदेशी
ग्रामसेवक दिक्षी