एसएमबीटी’ हॉस्पिटलमध्ये सात वर्षांत १८ हजार ४८९ यशस्वी हृदय उपचार

नाशिक प्रतिनिधीवै

द्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटमधील हृदयविकार तज्ज्ञांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. गेल्या सात वर्षांत तब्बल १८ हजार ४८९ पेक्षा अधिक हृदयविकार शस्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केल्या आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या घोटी सिन्नर महामार्गावरील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये रुग्णसंख्यादेखील दिवसागणिक वाढताना दिसत असून हजारो सर्वसामान्य रुग्णांना याचा लाभ झाला आहे…

गेल्या अनेक वर्षांपासून एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हृदय विकार तज्ञ डॉक्टर्स २४ तास सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत याठिकाणी अवघड व जटील शस्रक्रिया याठिकाणी यशस्वी झाल्या असून अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर जिल्ह्यासह ठाणे आणि पालघर मधील रुग्णांची मोठी गर्दी रुग्णालयात होत आहे. येथे आलेल्या रुग्णांवर योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात.

मानवी हृदयात डावा आणि उजवा असे दोन कप्पे असतात. एका कप्प्यात दोन अशा एकूण चार झडपा असतात. उजव्या बाजूला पल्मिनरी आणि ट्रिक्युसाईड तर डाव्या बाजूला ऐरोटिक आणि मिट्रल या झडपा असतात.

हृदयातील रक्ताचा प्रवाह एकाच दिशेने मार्गस्थ करणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. हृदयातील रक्तप्रवाह विरुद्ध दिशेने होण्यास या झडपा प्रतिबंध करण्याचे काम करतात. परंतू त्या झडपांना काही विकार झाल्यास रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. परिणामी हृदयविकाराचा त्रास जाणवतो.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट हा पूर्णपणे स्वतंत्र विभाग आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पूर्णवेळ कार्यरत असते. या इन्स्टिट्यूटमधील उपलब्ध सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपकरणे याचा हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टरर्स हे प्रत्यक्ष आणि प्रभावी वापर करतात.

हायलाईट्स
· दर शनिवारी लहान मुलांची 2 डीइको मोफत तपासणी केली जात असून हृदय विकार तज्ञांचा मोफत सल्लादेखील रुग्णांना मिळतो.

· महिन्यातील प्रत्येक चौथ्या शनिवार आणि रविवारी बालहृदयरोग (डिव्हाईस क्लोजर) शिबीर आयोजित केले जाते. सातही जिल्ह्यातून याठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण येतात. दर महिन्यात ५० पेक्षा अधिक बालकांवर हे उपचार केले जातात.

· गेल्या महिन्यात लहान मुलांवरील हृदयउपचाराचा विक्रमदेखील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नोंदविण्यात आला

· अवघ्या आठ महिन्यांच्या बालकावर नुकतीच अवघड अशी शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

असे होते हृदयरोगाचे निदान
चेस्ट एक्स-रे, ईसीजी, कोरोनरी एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट आणि कार्डियक एमआरआय आदी तपासण्या केल्यानंतर हृदयरोगाचे निदान होते. हृदयाची झडप बदलणे आणि हृदयाची झडप दुरुस्त करणे, अशा दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. लहान बालकांच्या हृदयाची झडप दुरुस्त करण्याला प्राधान्य दिले जाते, जेणे करून भविष्यात ते चांगले जीवन जगू शकतील असाही एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचा प्रयत्न असतो.

एसएमबीटी हार्ट इन्सिट्यूट
एसएमबीटी हार्ट इन्सिट्यूटमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास या शस्त्रक्रिया मोफत असून बाह्यरुग्ण तपासणी देखील मोफत आहे. येथे बालहृदयरोग शस्त्रक्रियेत हृदयरोगासंबंधी सर्व प्रकारचे जन्मजात हृदयविकार, बलून शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपांची शस्त्रक्रिया, हृदयाचा वाल्व बदलणे अथवा तो दुरूस्त करणे या हृदयविकारावरील शस्त्रक्रियादेखील पूर्णपणे मोफत केल्या जातात.

वैशिष्ट्य हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ८१० बेडचा आंतररुग्ण विभाग, १०० आयसीयू बेड, १३ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक कॅथलॅब, १० एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड, २४ तास डायलिसिस सुविधा, २४ तास औषधालय सेवा, रुग्णांसाठी जेवणाची सुविधा मोफत, रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची सोय, २४ तास रुग्णवाहिका, २४ तास रक्तपेढी खुली आहे.

रुग्ण प्रथम – अचूक निदान, अचूक उपचार
प्रत्येक आजारावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, निर्सगरम्य परिसर, सेवाभाव जपणारे डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यातून अत्यल्प काळात एसएमबीटी हॉस्पिटलचे नाव सर्वदूर पोहोचले आहे. येथे उपचार घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या विश्वासाने रुग्ण येतात. दररोजची ही संख्या अगदी हजाराच्या पटीत असते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण येऊनही प्रत्येकाला उपचार मिळतातच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *