उत्तर महाराष्ट्र

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये  3 बालकांवर ओपन हार्ट सर्जरी

राज्यस्तरीय लाईव्ह कार्यशाळेच्या आयोजनामुळे बालहृदयरोग तज्ञांची स्तुतीसुमने

नाशिक : प्रतिनिधी

वरिष्ठ बालहृदयविकार तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळावे तसेच बालहृदयउपचार करताना कोणत्या पद्धतीने काळजी घेतली जावी या उद्देशाने उत्तर महाराष्टातील सर्वात मोठ्या चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच राज्यस्तरीय दोन दिवसीय लाईव्ह वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील नामवंत वरिष्ठ बालरोग व जन्मजात हृदयविकार तज्ञ डॉ सुरेश राव यांनी उपस्थित बालरोगतज्ञ, सर्जन आणि फिजिशियन यांना मार्गदर्शन केले. दोन दिवसीय आयोजित कार्यशाळेत ३ बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, मुंबईतील नामवंत बालरोग व बालहृदयविकार शस्रक्रिया तज्ञ डॉ सुरेश राव व एसएमबीटी हॉस्पीटलामधील हृदयविकार शस्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ विद्युतकुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालहृदय विकार व कन्जनायटल हार्ट शस्रक्रिया या विषयावर लाईव्ह कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल १०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, ऑपरेशन थिएटरमधून थेट ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशनसह एसएमबीटी लेक्चर थियेटर येथे थेट प्रक्षेपण या कार्यशाळेचे करण्यात आले.

डॉ. राव त्यांच्या बालरोग कार्डियाक ऍनेस्थेसियोलॉजिस्ट इंटेन्सिव्हिस्ट आणि परफ्युजनिस्ट व सहायक यांच्या संपूर्ण टीमसह एसएमबीटी कॅम्पसमध्ये दाखल झाले होते. त्यांनी एसएमबीटी येथील बालरोग हृदय शस्त्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.

जन्मजात बालहृदय विकार असलेल्या बालकांवर  बालहृदय  शस्रक्रिया तज्ञ ओपन हार्ट सर्जरी करतात. ही शस्रक्रिया करत असताना विशेष काळजी डॉक्टरांना घ्यावी लागते. अतिशय क्लिष्ट समजली जाणारी ही शस्रक्रिया काही तास चालते. याकाळात घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

लहान मुलांमध्ये जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण मोठे आहे. दर हजार जन्मलेल्या बालकांमध्ये जन्मत: हृदयरोग असल्याचे प्रमाण 6 ते 12 टक्के जास्त आहे. भारताच्या जन्मदराचा विचार केल्यास कन्जनायटल हार्ट डिसिज असणारी सुमारे 1.5 लाखाहून अधिक बालके दरवर्षी जन्मतात असे सांगितले जाते. लहान मुलांत जे जन्मजात आजार आढळतात त्यात हृदयरोगाचा वरचा क्रमांक आहे.
लहान मुलांचे बालहृदय विकारांचे प्रमाण अधिक असूनही तज्ञ डॉक्टरांची मात्र कमी वेळोवेळी जाणवते. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या शहरात जाऊन याठिकाणी उपचार करावे लागतात.  अशा अवघड समजल्या जाणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात एसएमबीटी हॉस्पिटलने पुढाकार घेत लाईव्ह वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात ठिकठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून दीड हजार पेक्षा जास्त शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त बालकांवर मोफत उपचार केले आहेत. पहिल्या दिवशीची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. सुरेश राव, डॉ हर्षल तांबे, डॉ गौरव वर्मा, डॉ विद्युतकुमार सिन्हा, अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर संतोष पवार त्यांनतर तब्बल तीन शस्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी नाशिक शहरातील एक्स्प्रेस इन हॉटेल येथे सायंकाळी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीदेखील शहरातील बालरोगतज्ञांनी हजेरी लावत परिसंवादात सहभाग घेतला.

एसएमबीटी हॉस्पिटल कॅम्पस खूप आल्हाददायक आहे. येथील सुविधा खूप चांगल्या आणि उच्च दर्जाच्या आहेत. सीव्हीटीएस टीमने जे आयोजन केले ते खूपच सुंदर आणि नियोजनपूर्वक होते. हे दोन दिवस खूप महत्वपूर्ण होते, नवीन कल्पनांना यातून वाव तर मिळेलच शिवाय नम्रतेचेही दर्शन यात घडले. डॉ विद्युतकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली मला खात्री आहे की, ही संस्था आणि सीव्हीटीएस विभागाचे कार्य उज्वल असेल. याठिकाणी पुन्हा यायला नक्की आवडेल.
डॉ सुरेश राव, ज्येष्ठ बालरोग व बालहृदय विकार शस्रक्रियातज्

एसएमबीटी हॉस्पिटलमधील सुविधा
• १ हजार बेडचे प्रशस्त हॉस्पिटल
• १०० आयसीयू बेड्स
• १७ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर्स
• अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण कॅथलॅब
• १० एनआयसीयू व पीआयसीयू बेड
• २४ तास डायलिसिस व औषधालय सुविधा

या सुविधा पूर्णत: मोफत
• नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरी पूर्णपणे मोफत
• मोतीबिंदू शस्रक्रिया पूर्णपणे मोफत
• लहान मुलांचे लसीकरण पूर्णपणे मोफत
• १४ वर्षांपर्यंत बालकांवर मोफत उपचार
• रुग्णांसाठी मोफत बससुविधा (नाशिक, कसारा व कल्याण येथून दरदिवशी)
• बाह्यरुग्णांसाठी पहिल्या तीन दिवसांचे औषधे मोफत
• लहान मुलांचे अतिदक्षता विभाग अर्थात एनआयसीयु पीआयसीयु पूर्णत: मोफत
• ओपीडी तपासणी पूर्णपणे मोफत
• रुग्णांना राहणे व जेवण मोफत
• मोफत गरोदर मातांची सोनोग्राफी आणि रक्ततपासणी पूर्णपणे मोफत
• कुटुंब कल्याण शस्रक्रिया मोफत
• शासनमान्य गर्भपात शस्रक्रिया पूर्णपणे मोफत
अल्पदरांत या सुविधा उपलब्ध
• अल्पदरात गर्भशयाची (हिस्टेरेक्टॉमी) अवघ्या ४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध
• दुर्बिणीद्वारे गर्भाशय तसेच अंडाशय शस्त्रक्रिया (लॅप्रो स्कोपिक हिस्टरेक्टॉमी) अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध
• वंध्यत्व तपासणी (इन्फर्टीलिटी) अवघ्या ३ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध

Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago