तरुण

खळखळून हसा शतायुषी व्हा”

 

 

…. “लाफ्टर इज अ गुड मेडिसिन” असं म्हटलं जातं ते उगाच नाही. मंडळी संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, जेव्हा आपण खळखळून हसतो तेव्हा आपल्या शरीरात ‘एन्डोर्फीन’ नावाचा हार्मोन तयार होतो आणि ह्या एन्डोर्फीनला म्हणतात नॅचरल पेन किलर. बघा आपल्या शरीरात कुठेही वेदना झाल्या की आपण डॉक्टरांकडे किंवा फार्मासिस्टकडे जातो. ते आपल्याला पेन किलरची गोळी देतात, आपण ती घेतो आणि थोड्या वेळात आपल्या वेदना कमी झालेल्या दिसतात. काय झालं, अहो शरीरात एन्डोर्फीन वाढला. जर हेच काम फक्त खळखळून हसण्याने होत असेल तर मग का घेता पेन किलर टॅबलेट.

…. मंडळी, हसा वेड्यासारखे, हसा रावणासारखे, अहो कोण काय म्हणेल याकडे कुठे लक्ष देता ? आयुष्य तुमचं वाढणार आहे लोकांचं नाही. संशोधनातून हे देखील सिद्ध झाले आहे की जेव्हा आपण खळखळून हसतो तेव्हा आपल्या शरीरात “अँटी एजिंग हार्मोन्स” वाढतात. बघा, किती छान आहे नाही… संधी मिळेल तेव्हा तुम्ही जर खळखळून हसत गेलात तर तुम्ही लवकर म्हातारे होणार नाहीत. क्या बात है, म्हणूनच बऱ्याच वेळा आपण एखादया व्यक्तीच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला जातो तेव्हा ज्यांची सेवापूर्ती असते त्यांच्याकडे बघून आपल्याला शंका येते की अरे, हे तर तरुण दिसतात मग यांची रिटायरमेंट आता कशी, कदाचित यांच्या जन्मतारखेत काहीतरी घोळ असणार. परंतु तसे काहीच नसते, त्यांचं वय अठ्ठावन्नच असतं परंतु त्यांच्या शरीरातील अँटी एजिंग हार्मोन्समुळे ते शारीरिक वयापेक्षा कमी वयाचे वा तरुण दिसतात. आता प्रत्येक वाचकाने ठरवावे की त्यांना लवकर म्हातारे व्हायचे की नाही.

…. आजकालच्या धकाधकीच्या स्ट्रेसफुल वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तींचे चेहरे जर बघितले तर ते अतिशय गंभीर दिसतात. असं वाटतं साऱ्या जगाचं टेन्शन ह्यांनीच घेतलं की काय ? अहो, सोडा सगळं आणि जगा हसत खेळत. तुमच्या खळखळून हसण्याने तुम्ही स्वतः तणावातून तुमची सुटका करणार आहात. आजकाल चिंता, नैराश्य ह्या गोष्टी अगदी लहान वयापासून सुरू झालेल्या दिसतात. मुलेसुद्धा आजकाल खळखळून हसतांना दिसत नाहीत. अगदी कृत्रिम हसतात सगळे. जर हे शाळेत जाणाऱ्या वयापासून सुरू होत असेल तर मुले पस्तीस चाळीशीतच वयस्कर दिसायला लागणार. मुलांना “हसविण्याचा क्लास” लावू नये म्हणजे जिंकलो आपण. बऱ्याच शाळांमध्ये “शिस्त लागली पाहिजे” असे कडक वातावरण असल्याने मुलांना हसू आले तरी ते आतल्याआत गिळतात. हसू द्या त्यांना.

…. त्या निसर्गाने खळखळून हसण्याची कला फक्त माणसाकडे सोपवली आहे, का ? तर त्याला माहित होते, हा मानव आपल्या लोभवृत्तीमुळे सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहणार त्यामुळे स्वतःला तणावात ठेवणार आणि स्वतःचे आयुष्य कमी करून घेणार. खळखळून हसण्यासाठी पैसे लागत नाहीत तर लागतो फक्त निरागसपणा. प्रत्येकाने आपल्या शरीरातील बालकाला जिवंत ठेवले तर निरागसता सहजच येते. घरातल्या सदस्यांसोबत खळखळून हसत जा म्हणजे पैसे देऊन हास्यक्लबला जाण्याची गरज भासणार नाही. काही मंडळी फक्त हास्यक्लबमध्येच हसतात इतर वेळी एकदम गंभीर राहतात. अहो सोडा ते पद आणि प्रतिष्ठा, निरोगी जगायचे असेल, आपणही ठणठणीत शंभरी पार करावी असे वाटत असेल तर आजपासून खळखळून हसा रावणालासुद्धा तुमचा हेवा वाटला पाहिजे असे हसा आणि स्वस्थ राहा.

।। शुभं भवतु ।।

 

…. डॉ.चिदानंद फाळके (स्ट्रेस रिलीफ एक्सपर्ट)

 

Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

11 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

11 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago