नवीन वर्षात चोवीस सार्वजनिक सुट्या
नाशिक ः देवयानी सोनार
नववषार्र्चा पहिला दिवस सुटीच्या दिवशी आल्याने नववर्षाचा स्वागताचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आगामी वर्षात सार्वजनिक सुट्या आणि त्याला जोडून येणार्या सुट्यांचे नियोजन करून प्रवास वा कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. नवीन वर्षात चोवीस सार्वजनिक सुट्या असून, सर्वाधिक सुट्या एप्रिल महिन्यात आहेत. सर्वांत कमी जून आणि जुलै या महिन्यात सुट्या आहेत. यंदा अधिकमास 18 जुलैपासून सुरू होत आहे. श्रावणात आलेल्या मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिकमासाचे महत्त्व जास्त आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
सन 2023 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर झाली आहे. सन 2023मध्ये एकूण 24 दिवस सार्वजनिक सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. बँकांसाठी एक दिवस अधिक सुटी जाहीर करण्यात आलेली आहे.
यामध्ये प्रजासत्ताक दिन गुरुवार, महाशिवरात्री 18 फेब्र्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) 7 मार्च मंगळवार, गुढीपाडवा 22 मार्च बुधवार, रामनवमी 30 मार्च गुरुवार, महावीर जयंती 4 एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे 7 एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल शुक्रवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, महाराष्ट्र दिन 1 मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा 5 मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) 28 जून बुधवार, मोहरम 29 जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 16 ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर सोमवार, दसरा 24 ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावास्या (लक्ष्मीपूजन) 12 नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) 14 नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस 25 डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
अधिकमास दुग्धशर्करा योग
श्रावण महिना आणि याच महिन्यात येणारा पुरुषोत्तम मास असा दुग्धशर्करा योग यंदा होत आहे. त्यामुळे अधिकमासाचे महत्त्व अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे श्रावण दोन महिने असणार आहे. 2023 मध्ये अधिकमास 18 जुलैपासून सुरू होईल आणि 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या कालावधीला पुरुषोत्तम/मल/अधिक श्रावण मास संबोधलं जातं.
यंदा केवळ एकच अंगारकी चतुर्थी
मंगळवारी येणार्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. यंदा 19 सप्टेंबरला अंगारक योग आला आहे.
वर्षातून दोनदा अंगारकी चतुर्थी येते. यंदा मात्र एकदाच अंगारक योग आला आहे.अशा आहेत सुट्या
जानेवारी दि.26
फेब्रुवारी दि.18
मार्च दि.22,30
एप्रिल दि.3,7,14,22
मे दि.1,5
जून दि.29
जुलै दि.29
ऑगस्ट दि.15,16
सप्टेंबर दि.19,28
ऑक्टोंबर दि.2,24
नोव्हेबर दि.14,15,27
डिसेंबर दि.6,25