सिडको : दिलीपराज सोनार
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ असलेल्या एका सोफा सेट बनविणा-याच्या कारखान्याला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे आग इतकी भयानक होती की अवघ्या काही क्षणातच शेजारी असलेल्या चारचाकी वाहनांच्या गॅरेजला लागली या आगीत लाखो रुपयांच्या गाड्या जळून खाक झाल्या या आगीची माहिती मुंबई नाका पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान आगीवर नियंत्रण करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्त प्रयत्न करत आग नियंत्रणात आले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची चर्चा यावेळी सुरू होती
याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ असलेल्या डी एस फर्निचर या नावाची सोफासेट बनविण्याचा कारखाना आहे सायंकाळी ४वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली याआगीत सोफासेट बनविण्याचा कारखाना पुर्णपणे जळुन खाक झाला याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पंज, फोम, काथ्या,रेकझीन,कापड तसेच लाकडी साहित्य असल्याने आगीचे तात्काळ रौंद्र रुप धारण केले आगीच्या ज्वाळा आजुबाजुला असलेल्या चारचाकी वाहनांच्या गॅरेजला लागली यात लाखो रुपयांच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत या आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना तसेच मुंबई नाका पोलिसांना माहिती कळविण्यात आलीन यावेळी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने आग विझवण्याच्या कामात आडथळा निर्माण होत होता आगीवर नियंत्रण करण्यासाठी सर्वच विभागातील अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते तब्बल तासभरानंतर आगीवर नियंत्रण करण्यात आले असून आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही,