वडाळा गाव : प्रतिनिधी
पत्नीला समजावण्यासाठी वडाळागाव येथे गेलेल्या नवऱ्याला व त्याच्या कुटुंबीयांना सासरकडील नातेवाईकांनी लाकडी दांडक्यांनी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाहरुख फारुख अत्तार (वय २९), रा. तिरंगा कॉलनी, वालूज, औरंगाबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे आणि सना शाहरुख अत्तार यांचे लग्न २०२० मध्ये झाले असून, त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. सना ही दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणतीही माहिती न देता माहेरी वडाळागाव, नाशिक येथे दागिने व वस्तू घेऊन निघून गेली होती. पत्नीला समजावण्यासाठी शाहरुख अत्तार सोमवारी दुपारी ४ वाजता आपल्या आई-वडील, भाऊ अखलाक व अल्ताफ अत्तार तसेच इतर कुटुंबीयांसह वडाळागाव येथे गेले असता, त्यावेळी सासरच्या उमर अत्तार, मोईन अत्तार, फरीद अत्तार, शबाना अत्तार व शिरीन अत्तार यांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शाहरुख यांना मोईन अत्तारने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा भाऊ अखलाक याच्यावर उमर अत्तारने लाकडी दांडक्याने हल्ला केला, आई गुलशन अत्तार यांना शबाना व शिरीन अत्तार यांनी मारहाण केली. तसेच फरीद अत्तार याने लाकडी दांडक्याने भाऊ अल्ताफ याच्या डोक्यात जबर मारहाण केली. या झटापटीत गुलशन अत्तार यांच्या गळ्यातील सोन्याची पोत देखील गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात मोईन अत्तार, उमर अत्तार, फरीद अत्तार, शबाना अत्तार व शिरीन अत्तार आदींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. किशोर खरोटे करत आहे.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…