सोंग
श्रद्धा जाधव-बोरसेसोंग बरीच असतात. कुणाला हसवण्यासाठी कोणाला रडवण्यासाठी, कुणाला खोटा चांगुलपणा दाखवण्यासाठी, कुणावर दादागिरी करण्यासाठी, नसलेलं दाखवण्यासाठी, असलेलं लपवण्यासाठी माणसं खूप प्रकारची सोंग घेतात.
म्हणजेच काय हो खरा चेहरा लपवून घेतलेलं मुखवटारुपी चिलखत वास्तविकतेचा वार होताच गळून पडतात. सोंग जेव्हा उतरतात ना तेव्हा सगळं काही स्पष्ट आणि स्वच्छ होतं, नितळ होतं, कसलीही मळभ तिथे राहत नाही. तळ स्पष्ट दिसतो.
या स्वार्थी जगात काही गरजू लोक विदूषकाचे सोंग घेतात. ते इतरांना हसवण्यासाठी आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःचीच थट्टा करुन घेतात.
कलाकार आपली कला दाखवण्यासाठी विविध पात्रांच वेश परिधान करतात. म्हणजेच सोंग (वेश, भाव)घेतात. कलाकारांन घेतलेलं प्रत्येक पात्र इतरांनाच नाही, तर स्वतः पात्र घेतलेल्या व्यक्तीला त्या पात्राकडून चांगला, वाईट किंवा अपवादात्मक शिकवण देत असतात.
आयुष्यात अगणित प्रकारची लोक येतात. जीवन जगताना सर्वांची योग्य पारख करणे सगळ्यांना जमतेच असं नाही. चुका ह्या फक्त काही सरळ माणसांकडूनच होतात. आणि काही फक्त इतरांना तुम्ही कसं चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी फाजील हुशारीच सोंग घेतात.
आयुष्यात बरीच माणसं चांगुलपणाच, सात्विक असल्याचे भासवतात. पण वास्तविकता म्हणजे सत्य काही वेगळच असते. त्याचा त्रास त्यांना वेळ बदल्यावर होतोच. चांगुलपणाच सोंग घेतात येत नाही. काही गोष्टी ह्या रक्तातच असाव्या लागतात. काहीच फक्त अपवाद असतात.
आयुष्यात खरं आणि खोटं सिध्द करताना चलाख लोक खोट्या,असत्यालाच खरं भासवितात. त्यांना त्यांच्या चलाखी, चतुराईवर फाजील गर्व असतो. खोटं ही अशी चादर आहे, जी तोंडावर घेतली तर पाय उघडे पाडते आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पाडते. म्हणुनच खोट्या लोकांना त्यांनच एक खोट लपवण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
सर्व काही जाणुन काहीच समजत नसल्याचही काही सोंग धरतात. थोडक्यात काय हो समोरच्याला वेडा बनवून स्वार्थ पुर्तीचा पेढा खातात. कुणा दुसर्‍याची चुक झाकण्यासाठी काही व्यक्ती जाणीवपूर्वक सर्व दिसुन काहीच न दिसण्याच सोंग घेतात परिणाम असा की, स्वतःचीच मानहानी करून घेतात.
दैनंदिन जीवनातही असं म्हणतात की, मांजराला वाटत की, आपण डोळे मिटून दुध पितो तेव्हा कुणी आपल्याला पाहत नाही, पण कुणीच जरी पाहत नसेल ना तर विश्वाचा मालक सर्व काही पाहतो हे सगळेच विसरून जातात. त्रास देणारा आणि सहन करणाराही…
कुणी एखाद्या व्यक्तीच्या महत्त्व पुर्ण बोलण्याकडे ही दुर्लक्ष करतात. ऐकुन न ऐकल्या सारखे भासवितात, न समजल्यासारखे भाव चेहर्‍यावर आणताना दिसतात. अश्या व्यक्ती स्वतः च नुकसान करून घेतात.
आयुष्यात सर्व सोंग आणु शकतो. पण पैशाचे सोंग आजवर कुणीही दिग्गज आणु शकलेला नाही. जेव्हा एखादया व्यक्ती आर्थिक स्वरूपात अडचणींचा सामना करताना किंवा गरज भासतांना जवळच्या व्यक्तींचे खरे रंग दिसतात.
पैसा ही अशी गोष्ट आहे जी सर्वाचच आयुष्य हाताळु शकते. पैसा नसेल तर गरजा कशा भागणार? आहे तोही कागदाचाच तुकडा पण सर्व व्यवहार चालतात त्यावर… त्याला मिळवण्यासाठी सर्वाचाच आटापिटा…
पैसा कमावण्यासाठी कुणी मेहनत घेतो तर कुणी चोरी करतो. ज्या व्यक्तींच्या आचरणात, मनात ज्या प्रकारचे विचार असतात ती व्यक्ती त्या पध्दतीने पैसा मिळवते, पण कुणालाच पैसा नसेल तर तो आहे असं सोंग आणता येत नाही.
चांगुलपणा, सात्विकता, निरागसता, साधेपणा, सरळ स्वभाव अशा असंख्य उच्च कोटीच्या गोष्टीच सोंग आणता येत नाही, ह्या उसण्या ही मिळत नाही. त्या निसर्गदत्त असाव्या लागतात. त्या मिळाव्यात म्हणून त्या निसर्गाची कृपा असावी लागते. हेच त्रिवार सत्य…
Ashvini Pande

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

3 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

4 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

4 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

4 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

4 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

5 days ago