विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक
नाशिक: प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. नाशिकमध्ये यापूर्वी पोलीस आयुक्त म्हणून काम केलेले रवींद्र सिंगल यांनाही पदक जाहीर करण्यात आले आहे.