नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत नाशिक शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांना नाशिककरांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘वोट कर नाशिककर’ हे अभियान यशस्वी केले.
रविवारी (दि. 11) पहाटे महात्मानगर मैदानावर आयोजित कार्यक्रमात नाशिक महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी उपस्थित नाशिककरांना 15 जानेवारी रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित नागरिकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, अजित निकत, उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. मिता चौधरी तसेच संपर्क अधिकारी योगेश कमोद, प्रल्हाद हंकारे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नाशिक बायकर्सच्या वतीने शहरात भव्य बाइक रॅलीचे वोटोथॉनच्या प्रारंभी करण्यात आले. या बाइक रॅलीला आयुक्त मनीषा खत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यानंतर पाच किलोमीटर व तीन किलोमीटर अंतराच्या वोटोथॉनमधील सहभागी धावपटूंनाही हिरवा झेंडा दाखवून वोटोथोनचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती अभियानात सहभाग घेत सिनेकलावंत किरण भालेराव यांनी आपली कला सादर करून तसेच बँडपथक, नाट्याभिनय, पथनाट्य आदी सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या वोटोथॉनमध्ये मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सर्व अधिकारी सहभागी झाले होते.
स्पर्धांतील विजेत्यांंना अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या विजेत्यांमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता. यंग इंडियन्स, नाशिक सायकलिस्ट्स यांचाही शहरातील विविध भागांतून उपक्रमात सक्रिय सहभाग लाभला. यापूर्वी शहरात राबविण्यात आलेले सायकल रॅली, गोदा आरतीदरम्यान मतदार शपथ, शैक्षणिक संस्थांचा सहभाग, पोलीस आयुक्तालयासोबत संयुक्त उपक्रम, प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचार्यांची शपथ, विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम अशा सर्व माध्यमांतून मतदार जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हे अभियान 14 जानेवारीपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. प्रत्येक नाशिककरांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. 15 तारखेला सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी यावेळी केले. संपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित नाशिककरांनी स्वाक्षरी अभियान राबवून मतदार जनजागृती केली.
Spontaneous response in the city to ‘Vote Nashikkar’
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…