श्रद्धा की दिखावा…?!

श्रद्धा की दिखावा…?!

 

लेखिका: सुप्रिया सुरवाडे

रामनवमी झाली पुढे अजून कृष्णाष्टमी येईल बरेच देवांचे जन्म आपण महोत्सव म्हणून आनंदाने साजरे करतो…पण त्यांचे आदर्श त्यांचं आदर्श जीवन,तत्व आपण जीवनात उतरवतो का???….
राम असो कृष्ण असो त्यांना आम्ही फक्त देऊळ आणि देव्हारा त्यापलीकडे झालंच तर विशेष एक दिवस अगदी फक्त एक दिवस देवाचा जीव गुदमरेस्तोवर देवाला त्रास देणारे,आठवण काढणारे आम्ही ,म्हणजे हे करू नका अस मी म्हणत नाही पण ते करताना आपला स्वार्थ किती आणि आपल्या त्या दिवशी जोडलेल्या भावना किती पवित्र आहेत याचा बंध एकदा तपासून नक्की बघुयात…
सोमवारच्या दिवशी महादेव मंदिरात दर्शनासाठी जावं तर एखादं छोटंसं मंदिर अगदी अगरबत्तीच्या धुराने भरमसाठ भरलेलं असतं ,मग ती अगरबत्ती कुठं केळीवर ,तर कुठल्या दुसऱ्या फलावर फक्त ठेवून दिलेली दिसते,प्रज्वलीत केलेले दिप काय तर त्यातून ओसंडून तेल पूर्ण मंदिरभर पसरलेल असतं ,स्वतःचा जीव त्या अगरबत्तीच्या धुराने गुदमरू नये म्हणून पटकन दर्शन घेऊन आपण पळ काढतो,पण कधी हा विचार करतो का ,ज्या देवावर आपली इतकी श्रद्धा भाव आहे त्याला अशा अवस्थेत आपण सोडून जातोय…फक्त महादेवंचं नाही अजून ही अशी बरीच परिस्थिती पहायला मिळते….
एखाद आपलं लहानग लेकरू असतं त्याला काही झालं तर जीव कुठं ठेऊ न कुठे नको अस होत कारण प्रेम असतं न तिथं ,मग देवावर आपलं प्रेम नसतं का? फक्त मनी नाही भाव आणि देवा मला पाव इतकंच आपल्या मनात असतं का..
जेव्हाही मंदिरांत आपण जातो ते मंदिर तितकंच पवित्र,स्वच्छ ठेवण आपलं कर्तव्य आहे ,
घरात थोडं जरी अस्ताव्यस्त पसारा झाला तरी आपली किती चिडचिड होते,मग मंदिरात असलेला तो गोंधळ , तो सर्व अस्ताव्यस्त पसारा पाहून ही असंच मन कधी कधी निराश होत नाही का?… लोक स्वतःची पूजा ,नवस सायास करून जणू काही देवावर उपकार करताय असंच देवाला सांगून जातात….
अहो मंदिर असो अथवा कुठलंही धार्मिक स्थळ तिथे आपण मनाची शांतता मिळवण्यासाठी जात असतो,तिथे पवित्रता ,शांतता राखण आपली जबाबदारी असते,आपल्यासोबत अजून काही भाविक असतात त्यांना ही दर्शन घ्यायची असतात तर आपण तो ही विचार करणं गरजेचं आहे न,की मंदिर आणि देव माझा मग मी कितीही पूजा करो ,करावी पूजा ,साधना पण इतरांचा विचार ही असावा ना ….
असो इथून पुढे नक्की विचार करूयात आणि आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊया..

–    सुप्रिया सुरवाडे

8830143055

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *