श्रावणमासातील आज पहिला सोमवार

शिवमंदिरांमध्ये गर्दी, नागपंचमीचाही योग
नाशिक : प्रतिनिधी
अधिकमास संपल्यानंतर श्रावणमासाला प्रारंभ झाला असून, व्रत वैकल्यांचा महिना म्हणून मान्यता मिळालेल्या श्रावणमासातील पहिलाच सोमवार आज असल्याने शिवभक्तांची मोठी गर्दी उसळणार आहे.
श्रावणमास हा व्रत वैकल्याचा महिना मानला जातो. सोमवार आणि शनिवार उपवास करण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही जपली जात आहे.
सोमवार हा शंकराचा वार समजला जातो. त्यामुळे शिवमंदिरांमध्ये आज मोठी गर्दी उसळणार आहे. कपालेश्‍वर तसेच त्र्यंबक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठीही भाविक मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. त्र्यंबकचा परिसर सद्या हिरवळीने दाटला आहे. अधुनमधून येणारा पाऊस, सर्वत्र हिरवाई, डोंगर कपार्‍यातून वाहणारे धबधबे यामुळे पर्यटकांचाही ओढा त्र्यंबकला वाढला आहे. रविवारी तर पर्यटकांची मोठी गर्दीच उसळते.
मालेगाव येथे झालेल्या प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेमुळे भाविकांची आस्था वाढली आहे. त्यामुळे इतर दिवशीही शिवमंदिरांत मोठी गर्दी होत असते. अशात आज श्रावणातील पहिलाच सोमवार असल्याने यात आणखी भर पडणार आहे.
नागपंचमीचाही योग
श्रावणमासात येणार्‍या नागपंचमीपासून हिंदूंच्या सणांना प्रारंभ होतो.नागपंचमीही यंदा सोमवारीच आल्याने दुहेरी योग जुळून आला आहे. नागपंचमीनिमित्त ग्रामीण भागात मुली, महिला झोके खेळतात. तर सायंकाळी वारुळाला पूरणपोळी आणि दुधाचा नैवेद्य दाखवितात. नाशिकच्या जवळच असलेल्या मखमलाबाद येथे असलेल्या नाग मंदिरात यात्रा भरणार आहे. त्यासाठी यात्रेची जय्यत तयारी केली जात आहे. या भागात एकमेव मंदिर असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते.

सोशल मीडियामुळे आधिक मासाचे अधिकस्य ब्रँण्डिंग

तीन वर्षांतून येणार्‍या अधिक मासामध्ये केल्या जाणार्‍या धोंड्यांच्या प्रथेचे यंदा कधी नव्हे एवढे उदात्तीकरण करण्यात आले. त्यात सोशल मीडियाचा वाटा मोठा होता. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अधिकमासाच्या धोंडे जेवणाचे फोटो, व्हिडिओमुळे यंदा कधी नव्हे एवढ्या दणक्यात धोंडा साजरा करण्यात अनेकजण पुढे होते. अनारसे, सोन्या चांदीच्या, तांब्याच्या भेट वस्तु देण्याबरोबरच जावयांचे औक्षण, स्वागत, फुलांच्या पायघड्या टाकण्यापासून तर फुलांची उधळण करण्यापर्यंतचे अनेक व्हिडिओ स्टेटसवर, सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे धोंडा पद्धतीचे मोठे फॅडच पाहावयास मिळाले.

धोंडा पद्धतीचे यंदा खूपच उदात्तीकरण झाले. कौटुंबिक असलेला हा सोहळा यंदा जाहीरपणे साजरा करण्यात अनेकजण आघाडीवर होते. पण यामुळे जे आई वडिल गरीब आहेत. त्यांना अपराध्यासारखे वाटते आणि एकत्र कुटुंबात तर यामुळे मुलींना अपराध्याप्रमाणे वाटले. आणि सगळ्या पद्धती सासरकडच्या लोकांना किंवा जावयाला द्यायच्याच असतात. माहेरच्या मंडळींसाठी अशा कोणत्या पद्धती नसतात. हा सोहळा खासगी ठेवता येऊ शकतो. जो मानपान जावयाला द्यायचा असेल तो घरगुती वातावरणात द्या. तुम्ही काय केले याचे प्रदर्शन करु नका. बर्‍याच कुटुंबाची परिस्थिती असली तरी आई वडिल थकलेले असतात. भावांच्या ताब्यात सगळा कारभार असतो. त्यामुळे अशा कुटुंबात अडचणी निर्माण होतात. ज्या कुटुंबातील नवरा समजूतदार असतो तो धोंड्याचा आग्रह नाही करत. पण बाकीच्या ठिकाणी यावरुन वादाचे प्रसंगही उदभवू शकतात. त्यामुळे रिल्स, स्टेटस टाकून आपण ऩेमके कसले उदात्तीकरण करतो आहे. याचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे आहे.

वर्षा सोनवणे, (गृहिणी)

Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago