नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील जाखोरी गावात श्रीदत्तात्रेय, हनुमान व बिरोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. भजन, आरत्या यामुळे गावाचा जत्रेचा माहोल बदलून गेला होता. त्या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कुस्ती स्पर्धा. या कुस्ती स्पर्धेत
जाखोरीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे काही घडले जे फक्त कुस्ती नव्हती, तो इतिहास घडवणारा क्षण होता.
जाखोरीच्या मातीवर पहिल्यांदाच दोन तरुणींनी समोरासमोर उभे राहत कुस्तीचा सामना खेळला. या रंगतदार कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधत जाखोरी हे कुस्तीचेच मैदान असल्याचे दाखवले.
कुस्तीच्या मैदानात दोन तरुणी उतरल्या होत्या. काल या मातीवर तरुणीशक्ती उभी राहिली होती. सामना सुरू झाला आणि शांतता क्षणार्धात टाळ्यांच्या गजरात बदलली. ही केवळ प्रदर्शन कुस्ती नव्हती. ही खरी ताकदीची कुस्ती होती. प्रत्येक पकडीत संघर्ष, प्रत्येक डावात संयम आणि जाखोरीचा अभिमान. स्पर्धा जिंकली एकीने, पण इतिहास घडवला दोघींनी मिळून. हा सामना आजचा नव्हता, तो होता उद्याच्या जाखोरीचा.

जेथे तरुणी आखाड्यात उतरतील हे स्वप्न पाहतील आणि ते पूर्ण करतील आणि आज ही जाखोरी बदलत आहे. याचा अभिमान सर्वानांच आहे. चिंचोलीची महिला कुस्ती विजेती पायल झाडे हिला कै. संपत पिराजी कासार (भगूर) यांच्या स्मरणार्थ सुहास खाडे यांच्याकडून गदा बक्षीस देण्यात आली. पुरुष कुस्तीचे कोटमगावचे विजेते अनुज संजय घुगे व ओढा येथील उपविजेता प्रकाश निकम यांनी या यात्रेत बहुमान मिळवला.

जाखोरी गावात श्रीदत्तात्रेय, हनुमान व बिरोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असताना गावातील प्रत्येक गल्लीत खाऊचे, खेळण्यांचे दुकान आणि सायंकाळी सहा वाजता बारागाड्या ओढण्याचा मोठा धार्मिक कार्यक्रम झाला. रात्री श्रीदत्तात्रेयांच्या पादुकांची मंदिरापासून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
यात्रोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष केशव धात्रक, जगदीश जगळे, कैलास कळमकर, अनिल ताजणे, किरण कळमकर, आप्पा कळमकर यांच्यासह सरपंच अर्पणा कळमकर, उपसरपंच राहुल धात्रक, माजी सरपंच गणपत जाधव, माजी सरपंच संजय धात्रक, माजी चेअरमन सोपानराव जगळे, मधुकर शेळके, अशोक धात्रक, सुभाष बोराडे, सोमनाथ बोराडे, सोपान कळमकर, नारायण ताजणे, संतोष बोराडे, राहुल खाडे, संतोष ताजणे, कोंडाजी ताजणे, दिलीप क्षीरसागर, अंबादास ताजणे, नितीन कानडे, सोपान बोराडे, सुनील बोराडे चंद्रभान पवार, अर्जुन पवार, संतोष सूर्यवंशी आणि उमर शेख, विश्वास कळमकर, मंगला जगळे, उज्ज्वला जगळे, जया चव्हाण, प्रकाश पगारे, ज्योती पवार, चेअरमन भाऊसाहेब खाडे, प्रवीण पगारे, रतन कळमकर, संतोष बोराडे, संपत धात्रक, सुरेश सोनवणे, मनूबाई धात्रक, परशुराम जगळे आदींसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यात्रा कमिटी व ज्येष्ठ नागरिक उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील होती.