आस्वाद

लिहित्या हाताच्या स्रिया…

लिहित्या हाताच्या स्रिया…

 

‘शक्तिरूपेण संस्थिता’ असलेल्या स्त्रीच्या प्रगतीला वाव देण्यासाठी लिहित्या हाताच्या स्त्रियांनी मराठी साहित्याचं दालन समृद्ध केलं ; कारण तिच्याकडे जीवनाचा अगणित अनुभव संवेदनशीलता, सृजनशीलता,सर्जनशीलता, करुणा ,ममत्व असे स्त्रीवादाचे असंख्य कंगोरे आहेत . पारंपारिक लेखनातून बाहेर पडून स्त्री साहित्यात सक्षम लिखाण आजची स्त्री करते आहे.. याची एक जिवंत, ऐतिहासिक नोंद ठेवणारी घटना सन २०१९ मध्ये घडली ती म्हणजे ‘आम्ही लेखिका’ या संस्थेची शाखा नाशिक मध्ये स्थापन झाली. त्याचे पहिले-वहिले साहित्य संमेलन उत्कृष्ट संयोजनाने आणि सर्व सखींच्या सहयोगाने पार पडले. त्यातूनच महाराष्ट्रात स्री साहित्य चळवळीची परंपरा निर्माण करून प्रतिवर्षी राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन घेण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि ह्या महिला साहित्य संमेलनासाठी प्रत्येक सखींनी स्वमताने पदभार सांभाळला त्याचे प्रमुख कारण संस्थेच्या ऊर्जस्वल अध्यक्षा मा. डॉ. प्रतिभा जाधव ! त्यांच्या नेटक्या नियोजनाने आम्ही लेखिका प्रमाणेच संस्थेला नव्या नियोजनातून आणि संयोजनातून साकारण्यात आले . ‘आम्ही लेखिका-तुम्ही लेखिका’ – ह्या नाशिक शाखेच्या महिला साहित्य संमेलन २०२० ची ‘साहित्य सखी संमेलन’ रूपात जोमाने तयारी सुरू झाली . वेगवेगळ्या समित्या स्थापन करून प्रत्येक साहित्य सखीला काही ना काही आवडीची जबाबदारी देण्यात आली . ह्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष , उद्घाटक , प्रमुख अतिथी यांची निवड करून कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेखा केली आली. दिवसभराचा दोन सत्रांमध्ये होणारा भरगच्च कार्यक्रम तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातून येणाऱ्या कवयित्रींचं भव्य कवी संमेलन ! कार्यक्रमामध्ये सन्मान चिन्ह , बॅचेस , पुस्तक भेट , ड्रेसकोड तसेच एकपात्री प्रयोग, पुस्तक प्रकाशन शिवाय चहा ,नाश्ता , सुग्रास भोजन या सगळ्या मधून ह्या सोहळ्याचं वैविध्य प्रतिवर्षी जपलं गेलं .

“:स्त्रियांनी स्त्रियांसाठीच व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब आणि परिवर्तनाची घटना आहे अशी कुठलीच क्रांती एका दिवसात होत नसते त्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी जावा लागतो . तसेच गॅस ज्योत गुलाबी असते पण चटका मात्र गुलाबी नसतो ” असे स्त्रीच्या व्यथा वेदनेवर प्रकाश टाकणारे विचार मूल्य २०२१ च्या महिला साहित्य संमेलनात संमेलनाच्या उद्घाटक मा. शमीभा पाटील यांनी व्यक्त केले. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा मा. प्रा .सुमती पवार यांनी जे हित साधते ते साहित्य , समाजाचे अभिव्यक्ती आहे असे मौलिक विचार मांडले तसेच प्र. अतिथी मा. सुनंदा जरांडे होत्या .

एक शिस्तबद्ध तसेच सर्व सखींच्या संयोजन , नियोजनातून आणि नाममात्र नोंदणी शुल्कातून साकारलेल्या ह्या संमेलनाचे यंदाचे हे चौथे वर्ष !

साहित्य सखी राज्य महिला साहित्य संमेलनासाठी यंदा ही संमेलनाच्या उद्घाटक मा. दिशा शेख , संमेलनाच्या अध्यक्षा मा. प्रा. छाया लोखंडे , प्र . अतिथी डॉ. सीमा गोसावी अशा नामांकित अतिथी लाभल्या आहेत .

रविवार दि. २५ डिसेंबर ,२०२२ रोजी सकाळी दहा ते सहा ह्या वेळात हे साहित्य संमेलन स्त्री मंडळ हॉल तिडके कॉलनी नाशिक येथे संपन्न होत आहे . ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण साहित्य सखी संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. प्रतिभा जाधव यांचा सर्वदूर देशाबाहेरही पोहोचलेला ‘मी अरुणा बोलतेय!’ हा एकपात्री प्रयोग तसेच तणाव व्यवस्थापन समुपदेशन प्रात्यक्षिक – डॉ. दीपक आणि प्रिती पाटील

आणि सर्व सहभागी कवयित्रींचे भव्य कवी संमेलन असा दिवसभराचा साहित्यिक मूल्य असलेला कार्यक्रम संपन्न होत आहे . या संमेलनासाठी अहमदनगर ,पुणे ,अकोला, मुंबई, लातूर, नंदुरबार ,बारामती तसेच नाशिक , सिन्नर लासलगाव ,पिंपळगाव बसवंत अशा विविध ठिकाणाहून कवयित्री सहभागी होत आहेत . शिवाय संमेलनामध्ये ‘विचार पेरत जाऊ’ – प्रा. डॉ. प्रतिभा जाधव आणि अलका कुलकर्णी लिखित ग्रंथाचे आणि कवी केशवसुतांवरील चरित्र लेखन – प्रा. डॉ. वैशाली कोटंबे लिखित ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होणार आहे .

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जशी स्त्री आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारते.. तोच स्वभाव या महिला साहित्य संमेलनातही स्री रूजवते आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. प्रतिभा जाधव , सचिव अलका कुलकर्णी, उपाध्यक्षा एड.मिलन खोहर तसेच सर्व सदस्य सखींनी आयोजित केलेल्या संमेलनाला ह्या पूर्वी रंजना शेलार , डॉ. वेदश्री थिगळे , प्रा. सुमती पवार ह्या माजी अध्यक्षांच्या शुभेच्छा सोबत घेवून यंदा ही रसिक महिला साहित्यिकांनी ह्या संमेलन सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कार्यकारिणी ने केले आहे..कारण स्त्री कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी फक्त महिला दिन च कशाला हवा ? स्त्री शक्तीचा पुन्हा एकदा जागर करण्यासाठीच हे राज्य महिला साहित्य संमेलन संपन्न होते आहे.

 

अलका कुलकर्णी

साहित्य सखी सचिव

Ashvini Pande

Recent Posts

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

4 hours ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

7 hours ago

शेतकरी ओळखपत्र आजपासून अनिवार्य

8 लाख 75 हजार 912 शेतकर्‍यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…

7 hours ago

घोटेवाडीत सहा ट्रॉली कडब्यासह 55 टन मुरघास आगीत भस्मसात

दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…

7 hours ago

नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन सायकल भेट

नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…

7 hours ago

डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध घटनांचे उपनगरला प्रदर्शन

उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…

8 hours ago