नाशिक

नूतन वर्षाचा प्रारंभ देवदर्शनाने!

सर्वत्र भक्तीचा महापूर, पर्यटनस्थळेही फुलली
नाशिक : प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने अथवा ट्रेक्रिंगने करण्याची क्रेझ अलिकडच्याकाळात मोठ्या प्रमाणात आली असल्याने काल देवदर्शनाने अनेकांनी नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला. शहरातील जवळपास सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली. तर पर्यटनस्थळेही गजबजून गेली होती.
कपालेश्‍वर येथील मंदिरात भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाल्याने भाविकांची रांग लागली होती. तर सोमेश्‍वर महादेव, विल्होळी येथील जैन मंदिर तसेच तपोवनामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. मावळत्या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. दोन वर्षे कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे भाविकांना मोकळेपणाने कुठे जाता आले नव्हते. मात्र, मागील वर्षापासून कोरोनाचे निर्बंध हटल्याने आता भाविक मुक्तपणे देवदर्शन करू शकत असल्याने यंदा नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला.
गजानन महाराजांसह, स्वामी समर्थ केंद्र, निवृत्तीनाथ मंदिरातही काल भाविकांची मोठी गर्दी दिसून  आली. वाढोली येथे बनविण्यात आलेले शक्तिपीठ येथे देखील भाविकांची काल गर्दी होती. त्र्यंबकराजाचे दर्शन करुन आलेले भाविक जाताना या सर्वच ठिकाणी थांबत होते. पर्यटन स्थळे फुलली
नाशिक  मंत्रभूमीबरोबरच पर्यटनस्थळासाठी देखील प्रसिद्ध आहेत. बाहेर गावातील नागरिक नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी नाशिकला आल्यामुळे शहरातील पर्यटनस्थळे गर्दीने फुलली होती.
त्र्यंबकेश्‍वरला वाहनांच्या रांगा
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकमध्ये काल नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि रविवारची सुटी यामुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिराच्या आवारातच भाविकांची मोठी गर्दी झाल्याने उत्तर दरवाजाबाहेर भाविकांना प्रवेश करताना येथील सुरक्षारक्षकांबरोबर खटके उडत होते.
नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि त्यात आठ दिवस वज्रलेपणामुळे त्र्यंबकचे मंदिर बंद राहणार असल्यामुळे काल त्र्यंबकला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नाशिक -त्र्यंबक रस्त्यावर वाहनांची दाटी झाली. जव्हार फाट्याजवळ नगरपालिकेचे कर्मचारी तसेच काही खासगी युवक नाशिकबाहेरील भाविकांकडून एन्ट्री फी घेत आहेत. मात्र. यामध्ये मोठा घोळ असून, पैसे घेतल्यानंतर बाहेरगावच्या भाविकांना पावतीही दिली जात नाही. त्यामुळे ही एकप्रकारची लूट सुरू असल्याची तक्रार अनेक भाविकांनी केली.
मंदिराच्या बाहेर काल दोनशे रुपये पासधारकांची मोठी गर्दी दिसून आली. यामुळे देवस्थानच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी यामुळे मोफत दर्शन कोठून घ्यायचे याबाबत कोणी मार्गदर्शन करीत नसल्याने उत्तर दरवाजाबाहेर मोठी गर्दी दिसून येत आहे.
Ashvini Pande

Recent Posts

टायर फुटल्याने बिंग फुटले

टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे‌…

12 hours ago

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…

12 hours ago

मोहदरी, चिंचोली शिवारात डोंगराला आग लागून २५ हेक्टर गवत खाक

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…

12 hours ago

बहिणीच्या लग्नाला जमविलेली पुंजी सहीसलामत

आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…

13 hours ago

कला मेळाव्याने शिक्षणाला नवा आयाम

नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…

13 hours ago

आरोग्य कर्मचार्‍यांचा सेल्फी हजेरीला विरोध

जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्‍यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक…

13 hours ago