आजपासून राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन

 

नाशिक : प्रतिनिधी

योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचालित दोन दिवसीय योगशिक्षक संमेलनाचे शनिवारी (दि. १०) उद्घाटन केले जाणार आहे. १० व ११ डिसेंबर रोजी पंचवटी, तपोवन येथील संत जनार्दन आश्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज नील पवार यांच्या प्रेरणेतून संमेलन होणार आहे. संमेलनात राज्यातील कानाकोपऱ्यातून ७५० पेक्षा अधिक योगशिक्षक सहभागी होणार आहेत. योग विद्या गुरुकुलचे कुलगुरू डॉ. विश्वास मंडलिक यांच्या हस्ते या योगोत्सव २०२२ संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवगोरक्ष योगपीठाचे महामंडलेश्वर १००८ शिवानंद महाराज, संत जनार्दन स्वामी आश्रमाचे अनंत विभूषित स्वामी माधवगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत. योगाचार्य अशोक पाटील हे संमेलनाध्यक्ष असून, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. विशाल जाधव आहेत. तसेच राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष राहुल येवला आहेत तर समन्वयक उत्तमराव अहिरे, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आहेत. दोन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, योगाची गरज याविषयावर मंथन होणार आहे. तसेच व्याख्याने, योगाशी संबंधित प्रात्याक्षिके, संशोधनपर निबंध, संगीत रजनी आदी कार्यक्रही होणार आहेत. संमेलन यशस्वीतेसाठी कृणाल महाजन, सदानंद वाली, भालचंद्र नेरपागार, चंद्रकांत अवचार, अंजली देशपांडे, संतोष खारटमोल, डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. तस्मिना शेख, जिवराम गावले, शांताराम पाटील, दीपाली लामधाडे, किशोर भंडारी, मंदार भागवत, मनोज लोणकर, डॉ. प्रीती त्रिवेदी आदी विविध समित्यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *