शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून आली. सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील हे रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हेगार वॉच ड्युटी करत असताना त्यांना जनरल तिकीट घराजवळ एक काळ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची स्पोर्ट एम.एच. 15 जेव्ही 29 18 ही दुचाकी मोटारसायकल मिळून आली. सदर गाडीच्या नंबरप्लेटवरून मूळ मालक विकास विलास खिल्लारे, रा. सिन्नर, नाशिक यांचा शोध घेऊन त्यांना सदर गाडी मिळून आल्याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चार-पाच महिन्यापूर्वीच सदर गाडी चोरी झाल्याबाबत सिन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. तेथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून गाडीबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.