नाशिक

साडेपाच लाखांच्या चोरीच्या दुचाकी हस्तगत

सराईतासह विधिसंघर्षित बालक ताब्यात

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक-2 ने मोठी कारवाई करत एका सराईत चोरासह विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणार्‍या आणखी एका आरोपीला ताब्यात घेत पाच लाख 40 हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखा युनिट-2 चे अधिकारी मोटारसायकल चोरीच्या घटनांचे तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना, दोन जण चोरीची बुलेट विक्रीसाठी पिंपळगाव खांब परिसरातील मनोहर लॉन्ससमोर येणार असल्याची माहिती मिळाली. प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व डॉ. समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी गौरव शिवानंद प्रसाद (19, रा. पंचवटी, नाशिक) याच्यासह एक विधिसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत त्यांनी नाशिक शहर तसेच सिन्नर तालुक्यातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करताना वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
आरोपींकडून चोरीच्या मोटारसायकली प्रथमेश विनोद जोशी (रा. सावरकरनगर, मनमाड, ता. नांदगाव) याला विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत गंगापूर पोलीस ठाण्याचे पाच, सरकारवाडा पोलीस ठाण्याचा एक आणि सिन्नर पोलीस ठाण्याचा एक, असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

6 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

7 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

7 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

7 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

7 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

7 hours ago