सिडको : चेतनानगरमधील बाजीराव आव्हाड चौक परिसरात पार्क केलेल्या क्रेटा गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 1 लाख 32 हजार 500 रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पेश सुनील पाटील (वय 29, रा. चेतनानगर, नाशिक) हे आपल्या 15 8088 क्रमांकाच्या क्रेटा गाडीतून काही कामासाठी गेले होते. त्यांनी गाडी पार्क करून तिच्यात 1 लाख 32 हजार 500 रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. काही वेळाने परत आल्यानंतर त्यांनी पाहिले असता, गाडीच्या पुढील डाव्या दरवाजाची काच फोडून रक्कम चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.