नायलॉन मांजाचा जीवघेणा खेळ थांबवा

 

सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास इंगळे यांचे आहावन

नाशिक : प्रतिनिधी

शहरात नुकतीच संक्रात झाली. मात्र यावेळीही नेहमीप्रमाणे बंदी केलेला व घातक असलेला नायलॉन मांजाचा बेसुमार वापर करताना अनेकजन दिसून आले. शहरातील गच्या, मैदानांवर हा घातक नायलॉन बिनधास्त वापरला जात होता. मात्र हा मांजा आता पक्षांच्या जीवावर बेतत आहे. शहरातील विविध भागात नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी होत आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कायमस्वरुपी कठोर कारवाइ करून अशा व्यक्तींवर संक्रात आणावी. अशी मागणी नाशिकरोड येथील सामाजिक कार्यकर्ते तुळ्शीदास इंगळे यांनी केली आहे.

 

हौसेपोटी अनेकजन पंतग उडवत असले तरी,आपल्या एका कृतीने नागरिक व पशु पक्ष्यांवर काय परिणाम होतो आहे. याचा विचार नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांनी आणि तो वापरणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. शासनाकडून संक्रात च्या वेळी काही ठिकाणी कारवाइ केली जाते. मात्र सरसकट नायलॉन मांजा हद्दपार होत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आता मांजाविरोधात लोकचळ्वळ व्हायला हवी. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घ्यावा. प्रत्येक शाळा, महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती होणे महत्वाचे आहे. सध्या याविषयी केवळ पर्यावरण, वन्यजिव प्रेमी यांच्याकडूनच प्रयत्न होताना दिसतात. या चळ्वळीत सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होणे असल्याचे मत इंगळे यांनी केले आहे. दरम्यान मकरसंक्रांत झाल्यानंतरही शहरातील नाशिकरोड, जेलरोड सह सर्व शहरात पतंग कटल्यानंतर हा मांजा अद्यापही झाडे, तारा, गच्चीवर लोंबकळत दिसतो आहे. त्यात पक्षी अडकून जखमी होत आहेत. काही ठिकाणी प्राणी, नागरिक जखमी देखील जखमी झाल्याच्या घटना शहरात घडल्या. शनिवारी लहान मुलगा याच मांजामुळे जखमी झाल्याचा प्रकार घडला. प्रशासनाने या मांज्यावर नियंत्रणासाठी कठोर होउन कडक अंमलजबाजवणी करावी. नायलॉन मांजावर महाराष्ट्रासारख्या एकट्या राज्यात बंदी घालून उपयोग नाही. तर देशभरात त्याच्या उत्पादनावरच बंदी घालावी. अशी मागणी तुळशीदास इंगळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *