शिवडे बंधार्यातील गळती काढण्यात नगरपालिकेला यश
सिन्नर : प्रतिनिधी
गेल्या पाच – सहा महिन्यांपासून सुरू असलेली शिवडे बंधार्यातील जलवाहिनीची गळती काढण्यात नगरपालिका प्रशासनाला अखेर यश आले आहे. रविवारी गळती काढण्याचे सुरू झालेले काम सोमवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण झाले. संध्याकाळी 5 वाजेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. ही गळती काढल्यामुळे दिवसाकाठी किमान 50 लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे सिन्नरकरांना आता पूर्ण दाबाने पाणी मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. नगरपालिका वाढत्या पाण्याच्या आता कसे नियोजन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिन्नर नगरपालिकेने 24 एप्रिल रोजी शिवडे बंधार्यातील गळती काढण्यास प्रारंभ केल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे हे काम थांबवण्यात आले होते. पुन्हा रविवारी (दि.28) दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस बंदोबस्तात गळती करण्याच्या कामास सुरुवात केली. बंधार्यातील पाणी विद्युत मोटारी टाकून आणि डोंगळ्यांच्या सहाय्याने
काढण्यात आले.
त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत गळती काढण्याचे काम सुरू होते. सोमवारी ही गळती काढण्याचे काम पूर्ण झाले, मात्र काही प्रमाणात गळती राहिल्याने पुन्हा ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत हे काम पूर्ण क्षमतेने पूर्ण झाल्यानंतर 5 वाजता कडवा धरणातून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत मेश्राम यांनी दिली.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…