नाशिक

तीन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याचा हल्ला

गणेशनगरातील प्रकार; मुलगी गंभीर जखमी

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव येथील गणेशनगर परिसरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे सदर चिमुकली गंभीर जखमी झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
आरोही विशाल जाधव या तीन वर्षांच्या मुलीवर गणेशनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून तिला त्या कुत्र्यापासून वाचवले व लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र, सदर मुलगी गंभीर जखमी असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले.
लासलगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना घडत आहेत. लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांच्या वतीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदनही देण्यात आलेले आहे, मात्र अजून कुठलाही बंदोबस्त केलेला नाही. या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पुन्हा लासलगावकरांनी केली आहे.

 

 

Gavkari Admin

Recent Posts

भाजपा नाशिक महानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…

1 day ago

रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये 20 रुपये वाढ

मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…

1 day ago

नाशकात चारशे मतदान केंद्रे वाढणार

नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…

1 day ago

जिल्ह्यात दहशत बिबट्याची, पर्वणी चोरांची

अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…

1 day ago

सिन्नरला अतिक्रमणांवर हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…

1 day ago

पाच कोटी द्या, दीड लाख मतांची सेटिंग करू देतो…

गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…

1 day ago