मुंबई : राज्याची लाइफलाइन म्हणून ओळख असलेले लाल परी आता नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे . एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस ‘ शिवाई ‘ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे . एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला . एसटी महामंडळातील पहिली एसटी इलेक्ट्रीक बस पुणे – अहमदनगरदरम्यान धावणार आहे . विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ . नीलम गोऱ्हे , उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री अनिल परब , एसटी मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण सोहळा पार पडला . या लोकार्पण सोहळ्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की , राज्यात १ ९ ३२ मध्ये खासगी सेवा सुरू झाली होती . त्यानंतर १ जून १ ९ ४८ मध्ये एसटी महामंडळाची बस धावली . परदेशांमधील बसेस प्रमाणे ही नवीन बस असल्याचे अजित पवार यांनी म्हटले . काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा झाला . नंतर त्याला मार्ग मिळाला . पण आता याला कोणाची दृष्ट लागू देऊ नका , असे आवाहनही अजित पवार यांनी केले . राज्यात टप्प्याटप्प्याने शिवाई बसेस सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले .
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…