जेएमसीटी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यास मारहाण
मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल
वडाळा गांव: प्रतिनिधी
वडाळा रोड येथील जेएमसीटी शाळेत अन्युअल स्पोर्टस् डे साजरा करत असतांना एका विद्यार्थ्यास खाली बसण्यास सांगितले, परंतु त्यास खाली बसण्यास उशिर का झाला याचा शिक्षकांना राग आल्याने त्यांनी विद्यार्थ्यास लाकडी काठीने मारहाण करुन शाळेतून काढून टाकण्याची व ब्लॅक लीस्ट करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार (दि.७) रोजी घडला असून दोन शिक्षकांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार परवेज मंजुर शेख, वय ३८ वर्षे, रा.चौक मंडई, जुने नाशिक. यांचा मुलगा नामे मोहम्मद सुहान परवेज शेख वय-१३ हा इयत्ता सातवी मध्ये जेएमसीटी स्कुल, वडाळा रोड, नाशिक येथे शिक्षण घेत असतांना व शाळेत अन्युअल स्पोर्टस् डे साजरा करत असतांना तेथे शिक्षक फारुक (पुर्ण माहीत नाही.) आले व त्यांनी मुलांना खाली बसण्यासाठी सांगितले, परंतु तक्रारदाराचा मुलास खाली बसण्यास उशिर का झाला याचा फारुक यांना राग आल्याने व त्यांनी तक्रारदाराच्या मुलास लाकडी काठीने मारहाण करुन मुलाचे ओठास, उजवे पायास व डावे खांद्यास दुखापत केली. तसेच जेएमसीटी स्कुल, वडाळा रोड, नाशिक या शाळेचे कॅम्पस पर्यवेक्षक आरिफ मन्सुरी यांनी तक्रारदाराच्या मुलास शाळेतून काढून टाकण्याची व मुलाला ब्लॅक लीस्ट करण्याची धमकी दिली म्हणून तक्रारदार परवेज शेख, यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फारुक व आरिफ मन्सुरी या दोन शिक्षकांच्या विरुद्ध तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.राजू शिंदे करत आहे.
सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…
144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…
विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…
नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांसोबत आमदार…
आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…
सिडको : विशेष प्रतिनिधी घरगुती प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावाचे अज्ञात ठिकाणी अपहरण केल्याचा आरोप एका…