बिबट्याला ठार करा या मागणीसाठी देवगाव येथे विद्यार्थी व ग्रामस्थांचे रास्ता रोको..
पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्यास घेऊन जाण्यास नागरिक व विद्यार्थ्यांचा विरोध….
समीर पठाण :- लासलगाव
निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला दरम्यान या बिबट्याला वन विभागाने रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावे या मागणीसाठी देवगाव येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे
विद्यार्थ्यांनी वनविभाग व पोलिसांना घेराव घालून वन विभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला असून जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे