अवनखेड येथे विद्यार्थ्यांचा तळ्यात बुडून मृत्यू
दिंडोरी प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी समाधान बकाराम कोकाटे वय वर्ष 15 इयत्ता नववीत शिकणारा हा विद्यार्थी मित्र बरोबर तेथील एका वाघदेव नगर वस्ती जवळ असलेल्या गावतळ्यात पोहण्यासाठी गेले असता समाधान कोकाटे या विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशन करीत आहे.