पार्किंगच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात      

 

नाशिक : अश्‍विनी पांडे

शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा  जुना आग्रा रोड  भागातील सीबीएस ते मेहेर या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. याभागात असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागत आहे.

सीबीएस परिसरात जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय,  विविध शासकिय कार्यालये व अनेक शाळा यांच्यामुळे नेहमीच वर्दळ असते. या रोडवर पार्किंगची भीषण समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक व महिला यांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास  करावा लागत आहे  अनेक पालकांनी व विद्यार्थ्यांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या असून त्यासाठी शालेय प्रशासनाने संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र केवळ प्रशासन आपल्या सोयीनुसार उत्तर देत असून त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे पालक’ विद्यार्थी व नागरिक त्रस्त झाले आहेत. शालेय  प्रशासनानेही वेळोवेळी कार्यालयांकडे तक्रार  केली आहे. या ठिकाणी  आदर्श माध्यमिक विद्यालय,डी डी बिटको बॉईज हायस्कूल, वाय डी बिटको बॉईज हायस्कूल, शासकीय कन्या शाळा  या अनेक शाळा असून तेथे विद्यार्थ्यांना रोजच येणे-जाणे करणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर विविध शासकीय कामांसाठी व जिल्हा न्यायालयात जिल्ह्यातून असंख्य नागरिक येत असतात त्यांनासुद्धा या समस्यांना तोंड द्यावे लागते. शाळांच्या समोर नो पार्किंग असूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी पाहायला मिळते यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यातून शाळेत जाणे व रस्त्यावर येणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुलींच्या शाळा असल्यामुळे या ठिकाणी अनेक गैरप्रकार वाढतांना दिसत आहेत. टवाळखोर मुलांची वर्दळ वाढली आहे. छेडछाडीच्या वेगवेगळ्या तक्रारीमध्ये वाढ होताना दिसत आहे , त्याचबरोबर काही शाळांच्या जवळच पोलीस व्हॅन न्यायालयात विविध कारणांसाठी  आरोपींना  आणले जाते. त्या व्हॅन शाळेच्या गेटजवळच नो पार्किंगमध्येच  उभ्या केल्या जातात. त्यामुळे  विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करीत   पालकांनी शाळांकडे तक्रारी केल्या आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *