सिन्नर : प्रतिनिधी
मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याचा राग आल्याने वरद प्रितम भालके (15) या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर येथे घडली. दहावीत गेलेल्या या विद्यार्थ्यांने राग अनावर झाल्याने हे कृत्य केल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सिन्नरमधील देवी रोड परिसरातील राम नगरीतील अमित सुरेश गजेकर (43) यांचा भाचा वरद (15) याच्या मित्राचा शनिवारी वाढदिवस होता. यासाठी जाण्याची त्याने तयारी केली. मात्र, घरच्यांनी वाढदिवस कार्यक्रमाला जाण्यास विरोध केला. त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊन बसला. याच दरम्यान कुटुंबातील सदस्य टीव्ही बघत होते. बराच वेळ होऊनही वरद बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता वरदने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चेतन मोरे तपास करत आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…