सिन्नर: प्रतिनिधी
ऑनलाइन कंपनीने केलेल्या फसवणुकीमुळे वावी तालुका सिन्नर येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली,-तालुक्यातील वावी येथील राहुल योगेश वाघ(वय २२) याने ऑनलाइन कंपनीला ११ हजार पाठविले होते त्यामोबदल्यात कंपनी त्याला पैसे देणार होती. परंतू त्या कंपनीने त्याला पैसे न पाठवता त्याच्याकडून पैशाची मागणी केल्याने त्याला त्रस्त होत त्याने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे,सोनवणे,ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.