पालखेडला तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
दिक्षी -निफाड तालुक्यातील पालखेड येथील मनोज भगिरथ जगझाप (वय 37) या तरूण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की पालखेड (मिरचिचे) ता.निफाड येथील मनोज भगिरथ जगझाप या तरूण शेतकर्यांने आर्थिक विवंचनेतुन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे द्राक्षबागेच्या व इतर पिकांच्या कोसळलेल्या बाजारभावातुन आर्थिक देवाण घेवाण पुर्ण होऊ शकली नाही त्यात एका बँकेकडुन घेतलेले कर्जांचे तगादे वाढल्याने या शेतकर्यांने हातउसने व नातेवाईंकाकडुन पैसे घेऊन या बँकेचे कर्ज नुकतेच भरले होते पुन्हा याच बँकेकडुन कर्ज घेऊन ज्यांच्याकडुन पैसे घेतले त्यांचे परत देऊ असे नियोजन असतांना या शेतकर्यांला बँकेने कर्ज देण्याचा नकार दिल्याने हा धक्का मनोजला सहन झाला नाही त्यात ज्यांच्याकडुन पैसे घेतले त्यांचे पैशांची परतफेड कशी करायची या विवंचनेत असतांना आज दिनांक 16 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आपला मोबाईल महत्वाची कागदपत्रे असलेेले पाँकिट विहिरीतील पेटित ठेवले व पोटाला दगड बांधुन विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली घरातील सदस्यांनी सगळीकडे शोधाशोध घेऊनही काहिच संपर्क होत नसल्याने मनोज कुठे गेला असावा या विचारात सर्व असतांना शंकेचे निरसन म्हणुन विहिरीलगत चपला दिसुन आल्या विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता मनोजचा मृतदेह विहिरीत आढळुन आला मनोजला उपचारासाठी पिंपळगावाच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनला याबाबत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवार यांचे मार्गदर्शनाखाली बोराळे करत आहे मनोजच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.