पालखेडला तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पालखेडला तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

दिक्षी -निफाड तालुक्यातील पालखेड येथील मनोज भगिरथ जगझाप (वय 37) या तरूण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की पालखेड (मिरचिचे) ता.निफाड येथील मनोज भगिरथ जगझाप या तरूण शेतकर्यांने आर्थिक विवंचनेतुन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे द्राक्षबागेच्या व इतर पिकांच्या कोसळलेल्या बाजारभावातुन आर्थिक देवाण घेवाण पुर्ण होऊ शकली नाही त्यात एका बँकेकडुन घेतलेले कर्जांचे तगादे वाढल्याने या शेतकर्यांने हातउसने व नातेवाईंकाकडुन पैसे घेऊन या बँकेचे कर्ज नुकतेच भरले होते पुन्हा याच बँकेकडुन कर्ज घेऊन ज्यांच्याकडुन पैसे घेतले त्यांचे परत देऊ असे नियोजन असतांना या शेतकर्यांला बँकेने कर्ज देण्याचा नकार दिल्याने हा धक्का मनोजला सहन झाला नाही त्यात ज्यांच्याकडुन पैसे घेतले त्यांचे पैशांची परतफेड कशी करायची या विवंचनेत असतांना आज दिनांक 16 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आपला मोबाईल महत्वाची कागदपत्रे असलेेले पाँकिट विहिरीतील पेटित ठेवले व पोटाला दगड बांधुन विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली घरातील सदस्यांनी सगळीकडे शोधाशोध घेऊनही काहिच संपर्क होत नसल्याने मनोज कुठे गेला असावा या विचारात सर्व असतांना शंकेचे निरसन म्हणुन विहिरीलगत चपला दिसुन आल्या विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता मनोजचा मृतदेह विहिरीत आढळुन आला मनोजला उपचारासाठी पिंपळगावाच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनला याबाबत  आकस्मिक  मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवार यांचे मार्गदर्शनाखाली बोराळे करत आहे मनोजच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

3 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

10 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago