युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

लासलगाव प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून वारंवार फोन करून बळजबरीने प्रेमाच्या जाळ्यात फसवणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी युवराज संजय घुगे पाचोरे बु ता निफाड जि नाशिक हा फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार फोन करून तू माझ्यावर प्रेम केले नाही व जर मला भेटायला आली नाही तर मी जीव देईन अशी धमकी देत होता या धमकीला घाबरून व त्रासाला कंटाळून सदर अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठूळे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *