मनमाड: प्रतिनिधी
येथील 28 युनिट येथे राहणाऱ्या कमलेश अशोक मोरे या 33 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्यांने राहत्या घरात ओढणीने(स्कार्फ) ने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असुन आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.आज पहाटे 4 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली याबाबत स्थानिक रहिवासी असलेले समाजसेवक पापाभाई थॉमस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करत आहेत. कमलेश हा शांत स्वभावाचा तरुण होता त्याच्या आई , सासूबाई आणि पत्नी व लहान मुलांसोबत तो येथील 28 युनीट रेल्वे क्वॉर्टरमध्ये राहत होता. त्याच्या मृत्युने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…