नाशिक :प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल सोमवार (दि.5)रोजी राहूल ढोले लिखीत आणि विक्रम गवांदे दिग्दर्शित स्वर्ग सुख या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
आजच्या जगात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधामागे धावत असून दुःखाचे डोंगर उभे करत आहे. आपल्या आयुष्यात येणार्या दुख:ला कळत नकळत आपण कारणीभूत असतो. आपल्या जवळ जी गोष्ट नाही ती मिळवण्याचा हव्यास आणि असलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष यामुळे वाटेला दुःख येत आहे.प्रत्येकालाच स्वर्गात असलेल्या सुखा बद्दल कुतुहल असते. नाटकात दाखवले आहे की स्वर्गा बद्दल मनुष्याला कुतुहल वाटते.पण वास्तविक स्वर्गात वास्तव्यास असलेल्या रंभा उर्वशी ना मात्र स्वर्गाही समाधान नसते. त्यांना पृथ्वीवरील मनुष्याचे कुतुहल वाटत असते. की मनुष्य कशा प्रकारे कष्ट करत आपल्या मनातील इच्छांची तृप्ती करतात.सुख मिळवता.
यातून हे दाखवण्यात आले आहे की प्रत्येकाला स्वतः पेक्षा इतर व्यक्ती सुखी वाटते.त्यामुळे आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा आनंद मिळवता येत नाही .सर्व असूनही सुख मिळवता येत नाही. आपण जसे आहोत तेच वातावरण आपल्यासाठी योग्य असत .आपण आहे त्या परिस्थितीत समाधान मानल तर आपल्याला निश्चित समाधान मिळू शकते.
नाटकाचे नेपथ्य दीपिका विक्रम,प्रकाशयोजना विनोद राठोड,पार्श्व संगीत अंकिता मुसळे,रंगभूषा माणिक कानडे यांनी केली आहे.तर नाटकात मुग्धा देशमुख आणि इश्वरी कोरान्ने यांनी अभिनय केला.
आज सादर होणारे नाटक: फ्रीडम 75 ,महात्मा फुले अकादमी ,येवला
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…