खडकेद येथे अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या
घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील खडकेद येथील विहिरीत एका अल्पवयीन मुलीचा व मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. दोघेही खडकेद येथील रहिवासी असून याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, खडकेद येथील शनिवारी एका विहिरीत दोन मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. याबाबतची खबर रामजी खतेले यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असता दोन्ही मृतदेहाचे हात ओढणीच्या सहाय्याने एकमेकांच्या हाताला बांधलेले आढळून आले.
पोलीसांनी पंचनामा करून सदर मृतदेह घोटी ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अजय खतेले, वय १७ वर्ष, रा. खडकेद असे मुलाचे नाव असून मुलीचे वय १६ वर्ष आहे. दोघांनीही ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून केल्याचा प्राथमिक अंदाज असुन या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…
डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…
राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…
नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…
इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…