*सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी*
*टपाल विभागाची 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष मोहिम*
*: मोहन अहिरराव*
*नाशिक प्रतिनिधी
महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून टपाल विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा यासाठी टपाल विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ 10 वर्षांच्या आतील वयोगटाच्या मुलींसाठी घेता येईल. सुरूवातीला रूपये 250 इतकी रक्कम भरून खाते सुरू करता येते. त्यानंतर दरवर्षी जास्तीत जास्त रूपये 1 लाख 50 हजार या खात्यावर जमा करता येतील. खात्यावर जमा केलेल्या रकमेवर पालकांना आयकरात 80-C अंतर्गत सूट घेता येईल. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 7.6 टक्के आकर्षक व्याजदर भारतीय टपाल विभागामार्फत दिले जात आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी 10 फेब्रुवारी च्या आत नजीकच्या पोस्ट ऑफीसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहनही प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.