‘सिमा’च्या अध्यक्षपदी सुकुमार नायर, सचिवपदी बबन वाजे

सिन्नर : प्रतिनिधी
येथील सिन्नर इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तथा सिमाच्या अध्यक्षपदी सुकुमार नायर यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी बबन वाजे यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सभेने या निवडीस एकमताने मंजुरी दिली.

मावळते अध्यक्ष किशोर राठी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी किरण भंडारी, राहुल नवले, रतन पडवळ, सुधीर जोशी, अरुण चव्हाणके, अतुल अग्रवाल, मुकेश देशमुख, सारंग कुलकर्णी यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी किरण भंडारी व विठ्ठल जपे, सहसचिवपदी मुकेश देशमुख, कोषाध्यक्षपदी राहुल नवले, तर सहकोषाध्यक्षपदी सुधीर जोशी यांची निवड करण्यात आली. तसेच संचालक मंडळावर लक्ष्मण डोळे, अजय बाहेती, किरण बडगुजर, नारायण क्षिरसागर, बाबासाहेब हरदे, सुनील कुंदे, सतीश नेहे, दत्ता नवले, नवनाथ नागरे, रामदास डापसे, अरुण खालकर, नीलेश सोनवणे, तानाजी वारुंगसे, प्रमोद कुटे, प्रसाद पाटोळे, शांताराम दारुंटे, अविनाश पोटे, गणेश ठोक, गणेश तटाणे, बनू पगार, किरण वाघ, सारंग कुलकर्णी, संजय पवार, रवींद्र मोगल, सुरज आव्हाड, दिनेश करवा, प्रविण महाजन, एकनाथ खेमनार, बबन सोनवणे, नीलेश निरगुडे, राहुल सोनवणे, संतोष विघे यांची निवड करण्यात आली.
सभेत सचिव बबन वाजे यांनी इतिवृत्त वाचन केले, तर उपाध्यक्ष किरण भंडारी यांनी गत आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर केला. नवीन आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास सभेने एकमताने मंजुरी दिली. यावेळी रतन पडवळ यांनी गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या सिमा क्रिकेट लीगची माहिती दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष सुकुमार नायर यांनी संस्थेच्या माध्यमातून उद्योजकांच्या समस्या सोडविणे तसेच उद्योगविकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. सभेचे सूत्रसंचालन सुधीर जोशी यांनी केले, तर अतुल अग्रवाल यांनी आभार मानले. सभेस तुकाराम एखंडे, अनिल साळुंखे, बाळासाहेब उंबरकर, सुहास अस्टुरे, अमोल निकम, यश बेळे, नंदकुमार पाटील, दीपक बोडके, रोमित पटेल, श्यामकांत हरदे आदींसह उद्योजक उपस्थित होते.

समिती पदाधिकार्‍यांची घोषणा

सभेत विविध विषय समित्यांच्या पदाधिकार्‍यांचीही घोषणा करण्यात आली. त्यामध्ये किशोर राठी (विश्वस्त कमिटी), किरण भंडारी (पॉवर कमिटी माळेगाव), विठ्ठल जपे (शासकीय समन्वय कमिटी), बबन वाजे (मीडिया कमिटी), दत्ता नवले (तक्रार निवारण कमिटी), नवनाथ नागरे (मेंबरशिप डेव्हलपमेंट कमिटी), नीलेश सोनवणे (पायाभूत सुविधा कमिटी माळेगाव), प्रमोद कुटे (रिक्रिएशन कमिटी), प्रसाद पाटोळे (स्पोर्ट्स कमिटी), अविनाश पोटे (पायाभूत सुविधा कमिटी, मुसळगाव), किरण वाघ (सीमा ऑफिस कमिटी), सारंग कुलकर्णी (आयटी व सोशल मीडिया कमिटी) आदींचा समावेश आहे.

Sukumar Nair appointed as president of ‘SIMA’, Baban Vaje as secretary

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *