मुंबई:
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.लावणीचा ठसकेबाज आवाज हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होतेय. लावणीला ठसकेबाज सूरात लोकांपर्यंत पोहचवण्यात सुलोचना चव्हाण यांच मोठ योगदान राहिलं.
फड सांभाळ तुर्याला गं आला, पाडाला पिकलाय आंबा या सारख्या ठसकेबाज लावण्यामुळे मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले, त्या 92 वर्षांच्या होत्या, गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या, त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला, वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा गाणे गायले होते, त्यानंतर त्यांनी एकाहून एक लावण्या सादर केल्या, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च, १९३३ रोजी झाला होता. प्रसिद्ध मराठी लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची ख्याती होती. ‘फड सांभाळ तुऱ्याला ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यासारख्या एकांहून एक लावण्या त्यांनी सादर केल्या .
त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने (२०१०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२) ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी ‘रंगल्या रात्री’ चित्रपटासाठी पहिली लावणी गायली होती.
सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.