उन्हाळ कांद्यात घट; लाल कांद्याची आवक वाढली

लासलगाव बाजार समिती : सरासरी 1900 रुपये प्रतिक्विंटल दर

लासलगाव : वार्ताहर
आशिया खंडातील कांद्याची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता उन्हाळ कांद्याचा हंगाम संपला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक झालेली नाही. दुसरीकडे, लाल कांद्याची आवक मात्र वेगाने वाढू लागली असून, शनिवारी बाजारभावातही चढ-उतार पाहायला मिळाले.
लासलगाव बाजार समितीत शनिवारी (दि. 27) लाल कांद्याची एकूण 823 नगांची आवक झाली. यामध्ये 227 ट्रॅक्टर आणि 596 पिकअपमधून सुमारे 12 हजार 430 क्विंटल कांदा लिलावासाठी दाखल झाला होता. बाजारभावाचा विचार करता, लाल कांद्याला कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 2,511 रुपये, तर सरासरी 1,900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. यंदा झालेल्या सतत पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले
आहे.
शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा चांगल्या भावाच्या आशेने चाळीत साठवून ठेवला होता; परंतु हवामानातील बदलामुळे साठवलेला कांदा खराब झाला. परिणामी, उन्हाळ कांद्याची आवक आता पूर्णपणे थांबली असून, बाजार समितीत केवळ लाल कांदा दाखल होत आहे.

Summer onion production declines; red onion arrivals increase

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *