महाराष्ट्र

सुनेत्रा पवार घेणार आज शपथ

महाराष्ट्राला लाभणार आज पहिल्या उपमुख्यमंत्री

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे समजते. आज, शनिवारी (दि. 31) सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, आज (दि. 31) सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे.
अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी यासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या चर्चेनंतर अरोरा यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी होकार दिल्याचे कळते. आज होणार्‍या बैठकीत नेता निवड होणार आहे.

Sunetra Pawar will take oath today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago