अबब,, सुनीता धनगर यांच्या घरी सापडले एवढे घबाड

नाशिक: पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या महापालिका शिक्षण अधिकारी यांना अटक केल्यानंतर पथकाने त्यांच्या घराची झडती घेतलीअसता मोठे घबाड पथकाच्या हाती लागले, सुनीता धनगर यांनी जमवलेली माया पाहून पथक अचंबित झाले,

एसीबीने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करत अटक केली होती. यानंतर त्यांच्या घराची एसीबीने झाडाझडती घेतली असता त्यात ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे सोने, २ फ्लॅट आणि एक प्लॉट असे घबाड हाती लागल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर  यांनी पत्रकार परिषदेत दिली, पालिका शिक्षण अधिकारी असल्याने त्यांनी एवढे घबाड जमा केल्याने पथक ही अचबीत झाले,

नाशिक महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करणाऱ्या सुनीता धनगर   आणि लिपिक नितीन जोशी या दोघांना एसीबीने लाच घेताना अटक केली होती, ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना  पथकाने त्यांना रंगे हाथ पकडले होते,

तक्रारदार हे मुख्याध्यापक असून त्यांना एक प्रकरणात निलंबित करण्यात आलेले होते, कामावर रुजू करून घेण्यासाठी लिपिक जोशी यांनी पाच हजार तर धनगर यांनी 45 हजार रुपये घेत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड पथकाच्या हाती लागले,

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

15 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

15 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

15 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

15 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

15 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

15 hours ago