सुपर 50 परीक्षेचा निकाल जाहीर

सुपर 50 परीक्षेचा निकाल जाहीर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील अनुसुचीत जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाचे उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशीत विद्यार्थ्यांकरीता सीईटी तसेच जेईई या व्यावसायिक प्रवेश परीक्षेकरिता जिल्हा परिषदेमार्फत ‘सुपर 50’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे, या उपक्रमांतर्गत घेतल्या गेलेल्या प्रवेश परिक्षेकरीता 2182 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल हा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक तालुक्यातील (प्रणाली बापुसाहेब वाघ बैठक क्रमांक – 09102) ही नाशिक तालुक्यातील विद्यार्थिनी 158 गुण मिळवुन प्रथम आली आहे.
जाहीर झालेल्या निकालातून विद्यार्थ्यांच्या कागद पत्रांची पडताळणी करून सुपर 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.
निकाल पाहण्यासाठी  https://zpnashik.maharashtra.gov.in/ लिंक वर क्लिक करावे. जिल्हा परिषद वेबसाईटवरील विभाग व योजना या भागातील शिक्षण (माध्यमिक) विभाग या अंतर्गत अधिक माहिती या सदरात सुपर 50 चा निकाल देण्यात आला आहे.

One thought on “सुपर 50 परीक्षेचा निकाल जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *