नाशिक: प्रतिनिधी
राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची मुंबई येथे अपर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस प्रबोधिनी त सहायक संचालक म्हणून अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.