कोकाटेंना सर्वोच्च दिलासा! आमदारकी कायम राहणार
मुंबई:
शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसद्वारे जारी केले आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी विसे मळा भागा मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी कमी उत्पन्न आणि घर नसल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण १९९५-९७ चे आहे. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रथम न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली, जी सत्र न्यायालयाने कायम ठेवली. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता सर्वोच्च न्यायालय कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
Manikrao Kokate suprim court
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…