नवी दिल्ली: संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरून गोंधळ घातल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदारांना आज निलंबित करण्यात आले, काल लोकसभा आणि राज्यसभेच्या 78 खासदारांना निलंबित करण्यात आले होते, त्यात आज आणखी 49 जणांना निलंबित केल्याने विरोदक संतापले आहेत, संसदेत मागील आठवड्यात तीन ते चार तरुण शिरले होते, त्यावरून आज सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत, आज सभापती ओम बिर्ला यांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह49 खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केले,