सुरई… कां सुरमई…”
………
“ए “
…..
“बोल ना ‘
“आज तुझंच ऐकावं वाटतंय”
“कसं काय बाबा एकदम’
” हो ना “
” कोयलसी तेरी बोली’
“अरे.. बापरे “
“हो ना… पण कोयल सारखंच बोल”
” लगेच सामानाची यादी, पोरांचे गाऱ्हाणे, शाळेचे प्रॉब्लेम नको सांगुस यार “
” पण. कसं हे असं”
वाटतंय आता.. तर वाटू दे की रे..”.
“चांगलंच आहे म्हणा”
‘पण असं बोल म्हणलं की कसं सुचेल ग रोमँटिक’
“तू….
मला एकदा काय म्हणलं होतंस आठवतंय”
” सांग ना “
“तुम्ही मारू आहात”
“हो?’
“हो..’
” मला मारुचा अर्थ माहित नव्हता”
” मग, “
” विचारणार कोणाला ना मग “
“मी तुझ्याच दीदीला विचारलं होतं.’
“कप्पाळ माझं”
” हो ना “
“मग,”
“दीदी म्हणाली,तुला कोण म्हणलं”
“मग, सांगितलंस माझं नावं’
“नाही इतकी मी हुशार आहे’
“मग सांग पटकन’
” राजाच नावं सांगितलं होतं”
‘”दीदीने राजाला धुतला चांगलं”
आणि हळूच दीदी म्हणाली होती…
” तू ज्या साडीत मारू दिसतेस असं तुला राजा म्हणाला ना ती साडी, तो सेट मला देतेस एक दिवस… घालायला….”
” मग,, “
“मग काय मी दिला दीदीला
किती गोड दिसतं होती दीदी त्या साडीत”
“हं . मग पुढे “
…..
” अरे आपण आपलं रोमँटिक बोलतोय ना.. मग दीदी कुठून आली…. मधेच “
” अरे…. दुसऱ्यांदा सुद्धा.. तसंच झालं”
“हं … बोल”
” तूला ते गाणं आठवत कां……गुन गुना रहे हैं भवरे खील रही हैं कली कली”
“हो… आराधना…..”
“हो “
” त्याचं काय “
” त्यांत शर्मिलाने घातले…तसें मी कानातले घातले होते आणि गच्चीवर तुला भेटायला आले… “
” बरं मग…”
” बरं मग नाही…. तू म्हणालास…
चिकनी दिसतियेस.. “
” मग दिसतस होतीस..तशी”
“अरे, पण मला अर्थ माहित नाही ना. मला वाटलं चिकन म्हणजे कोंबडी आणि चिकणी म्हणजे त्यांची मुलं….”
“कप्पाळ माझं…”
“पुन्हा प्रश्न… कुणाला विचारायचं”
” मग “
” नाही कुणालाच नाही विचारला”
“काही दिवसांनी अशोक सराफ रंजनाला म्हणतो… काय चिकनी दिसतेस…”
“मग “
“खुद्कन हसू आलं मग “
माठ होते रे मी अगदी “
“अजूनही आहेस…. परवा गच्चीवर चल खुणावले… तर म्हणालीस… मगाशीच आणलेत कपडे घड्या पण करून ठेवल्या त…”
“ती वहिनी म्हणाली म्हणून उठलीस तू… अगो उषा, पापड वाळले असतील ग “
“खरंच… माठ… अगदी माठ.. होते “
“माठ नाही…. सुरई…ती देखील मद्याने भरलेली “
……..
“आगोबाई….. हो कां..
………..
……आता मात्र अतीच झालं हो…
जा बरं… गुपचूप पडा आपल्या खोलीत जाऊन..”
……
” हो, आणि सगळं आवरणं झालं की ये तू भरून, काठोकाठ, सुरई…..”
” येतेस ना”
” आता…जाता गुपचूप की कसं…… “
आणि ती खुदुखुदू हसू लागली…
………
©विशाखा