पंचवटी : वार्ताहर
साप म्हटले की, भल्या भल्यांची त्रेधातिरपीट उडून जाते .परंतु महसूल विभागातील तहसीलदार साहेबराव सोनवणे हे एका सापाचा जीव वाचविण्यासाठी रात्रीच्या सुमारास धावून गेले.त्यामुळे सापाला जीवदान मिळाले.
साप दिसला की सगळेच हादरून जातात. काहींची तर भीतीने गाळणच उडते. पण प्रशासकीय सेवेत कार्यरत असतानाही सर्पमित्र म्हणून तहसीलदार सोनवणे यांचे नवीन रुप नागरिकांना पहावयास मिळाले. रात्री 9 ते 10 च्या सुमारास मखमलाबाद परिसरातील मानकर मळा, खंडेराव मंदिर भागातील दिशा शिवदर्शन रो बंगलो भागात हेमंत सूर्यवंशी यांना साप दिसला . तेंव्हा त्यांनी लागलीच रो बंगल्यातील एकाला सांगितले की याठिकाणी साप आहे .
महिला वारकऱ्यांना मिळणार या सुविधा
तेव्हा तेथील नागरिकांनी जवळच राहणार्या नाशिक येथील महसूल आयुक्ताल्यातील सर्पमित्र असलेले तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना कळविताच तेही हजर झाले. त्यांच्या समवेत त्यांचा मुलगाही आला होता. साप जवळपास अडीच ते तीन फुटाचा होता. परंतु ज्यांनी पाहिला त्यांना तो काय आहे हेही माहीत नसल्याने तेही जरा घाबरून गेले होते. परंतु सोनवणे आल्यानंतर त्यांनी घाबरून जाऊ नका डूरक्या घोणस जातीचा साप असल्याने तो विषारी नाही असे सांगितले.त्यांनी तात्काळ त्या सापाला पकडून ताब्यात घेतले . जेव्हा सूर्यवंशी यांनी इतका मोठा अधिकारी असूनही त्यांनी साप पकडला तेव्हा त्यांचे आभार मानले तेव्हा सोनवणे यांनी माझे नका आभार मानू तुम्हीच एका सापाचा जीव वाचवला, असे सांगितले.
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…
बोधलेनगरला बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका नाशिक : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या…
अंबरनाथमध्ये आठ वर्षाच्या बालकावर चार अल्पवयीन मुलांचा सामुहिक लैंगिक अत्याचार शहापूर : साजिद शेख कुटुंबीयांसमवेत…