सुरगाणा गटविकास अधिकारी लाच घेताना जाळ्यात
दोन लाख दहा हजार स्वीकारताना एसीबीने घेतले ताब्यात
नाशिक: प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत दोन कोटी 32 लाख 30 हजार रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात दोन लाख दहा हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यामुळे खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून, तक्रारदार यांचे दोन कोटी 32 लाख 30 हजार 27 रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे दोन लाख 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे पथकाने सापळा रचला असता तक्रारदार यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले . पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, किरण धुळे, पोलीस नाईक विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…