त्रंबकेश्वर येथील भूमिअभिलेखचा भूकरमापक लाच घेताना जाळ्यात
नाशिक: मोजणी करण्यासाठी तसेच जमिनीच्या हद्दीच्या खुणा दाखवण्यासाठी 35 हजारांची लाच घेताना त्रंबकेश्वर येथील भूमिअभिलेख विभागाचे प्रभारी भूकरमापक सचिन भाऊसाहेब काठे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या जमिनीच्या हद्दी खुणा दाखवण्यासाठी 40 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती ३५,०००/- रुपये स्वीकारले असता पथकाने रंगेहाथ पकडले.तक्रारदार यांचे “मौजे अंजनेरी ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक येथील सर्व्हे नं. १९९/ब मधील ४० गुंठे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्य कायम करण्यासाठी 35 हजारांची लाच स्वीकारल्याने काठे यांना ताब्यात घेण्यात आले असून मुंबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, हवा/प्रभाकर गवळी, पोना/ संदिप हांडगे,पोना/किरण धुळे , पोना/ सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने
श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर’ अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी
उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.