नाशिक

नाशिकमध्ये 23 ला प्रथमच सूर्यकिरण एअर शो

 

गंगापूर धरण परिसरात भारतीय हवाई दलाचा थरारक हवाई सोहळा

नाशिक ः प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिककरांसाठी देशभक्तीचा थरार अनुभव देणारा ऐतिहासिक क्षण लवकरच साकार होणार आहे. भारतीय हवाई दलाचा जागतिक कीर्तीचा सूर्यकिरण एअर शो नाशिकमध्ये प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य हवाई सोहळा दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत गंगापूर धरण परिसरात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक जिल्हा विकास आराखडा, तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पाश्वर्र्भूमीवर नाशिकच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाला जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय हवाई दल यांच्या संयुक्त विद्यमाने या एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण अ‍ॅरोबॅटिक टीम तब्बल नऊ हॉक एमके-132 लढाऊ प्रशिक्षण विमानांच्या सहाय्याने आकाशात थरारक कसरती सादर करणार आहेत. विविध अ‍ॅरोबॅटिक फॉर्मेशन्स, अचूक समन्वयात्मक उड्डाणे आणि नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिके पाहण्याची दुर्मिळ संधी नाशिककरांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रात्यक्षिकांदरम्यान विमानांची तांत्रिक माहिती, वैशिष्ट्ये आणि कसरतींचे थेट समालोचन ऐकता येणार असल्याने हा अनुभव अधिक माहितीपूर्ण ठरणार
आहे.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिकच्या इतिहासात प्रथमच भारतीय हवाई दलाकडून अशा स्वरूपाचे भव्य हवाई प्रात्यक्षिक सादर होत आहे. या माध्यमातून हवाई दलाचे सामर्थ्य, शिस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन नागरिकांना घडणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवस आधी होणारा हा एअर शो नाशिककरांसाठी पर्वणी ठरेल.
या कार्यक्रमासाठी 30 ते 40 हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने कडेकोट सुरक्षाव्यवस्था आखली आहे. वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन सेवा, तसेच प्राथमिक आरोग्य सुविधा कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या एअर शोसाठी प्रवेश शुल्क लागू करण्यात आले आहे. विविध श्रेणींतील तिकिटे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवाई दलाचे उच्चपदस्थ अधिकारी, तसेच अनेक अतिविशिष्ट मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक, तिकीट विक्रीची ठिकाणे व ऑनलाइन बुकिंग लिंकची माहिती लवकरच जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिक फेस्टिव्हलचा भव्य प्रारंभ

हा एअर शो फेब्रुवारीत होणार्‍या नाशिक फेस्टिव्हलचा भव्य प्रारंभ ठरणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये नाशिक जिल्ह्यातील वारसास्थळे, पर्यटनस्थळे, कृषी पर्यटन, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. यासोबतच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाइन फेस्टिव्हल आयोजित करण्याचाही मानस प्रशासनाचा आहे.

Surya Kiran Air Show to be held for the first time in Nashik on 23rd

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago